🕒 1 min read
पुणे : सेक्सविषया संदर्भातील ‘सेक्स तंत्र’ जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या जाहिरातीमुळे पुणे शहरामध्ये मोठी खळबळ उडाली असल्याचं समजतं आहे. अशातच या जाहिरातीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात त्यांनी आपल्या फेसबुक आकाउंटवरून एक मॅसेज पोस्ट केला आहे.
काय म्हणाल्या रूपाली पाटील ठोंबरे ?
पुणे हि शिवजन्मभूमी आहे. पुण्यात सेक्स तंत्रा नावाचे पोस्टर सोशल माध्यमावर फिरत आहे. हिंदूंचा पवित्र सण नवरात्री व पुण्यनगरीला बदनाम करण्याचे कारस्थान थांबवा, असं रूपाली पाटील ठोंबले यांनी म्हटलं आहे. सेक्स तंत्र आयोजकांना अगोदर चाबकाचे फटके मग कायद्याचे फटके मिळतील.
त्या पोस्टरवर प्रत्येकी फीस 15 हजार रुपये सांगण्यात येत आहे. हा प्रथमदर्शनी ऑनलाइन पैसे लुटणाऱ्या टोळीचा फ्रॉड असू शकतो किंवा पुण्याला बदनाम करणाऱ्या सेक्स तंत्रा आडून कुणी जर सेक्स रॅकेट चालवण्याचा प्रयत्न करणार असेल तर, इथं थिल्लर पणा चालणार नसल्याचा इशाराही रूपाली यांनी सेक्स तंत्र आजोजकांना दिला आहे. पुढे त्या असंही म्हणाल्या की, आपण हा थिल्लरपणा तात्काळ थांबवावा अन्यथा चुन चुनके व गिन गिनके कार्यक्रम होईल.
काय आहे ती जाहिरात ?
दरम्यान, सोशल मीडियावर जी जाहिरात ती सत्यम् शिवम् सुंदरम् फाउंडेशनतर्फे सेक्स प्रशिक्षण कॅम्पची जाहिरात करण्यात आली आहे. हा कॅम्प नवरात्र स्पेशल असून, ही जाहिरात ‘सेक्स तंत्र’ नावाने आहे. या जाहिरातीमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, 1 ते 3 ऑक्टोबरदरम्यान 3 दिवस 2 रात्र लैंगिक प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Hair Care | ‘हे’ लावल्याने केसातील खाज आणि कोंडा होईल… जाणून घ्या!
- Maharsashtra Rain | पुणे मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस! नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश
- Atul Londhe | “एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे”
- BJP । आदित्य ठाकरे यांच्या ‘या’ एका चुकीमुळे वेदांता गुजरातला गेला; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा थेट आरोप
- Shivsena । विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पवार हे दिल्लीत असे षड्डू ठोकत आहेत, पण…; शिवसेनेचं दिल्लीतील घडामोडींवर भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
