अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार हे नाराज असल्याची अधूनमधून चर्चा सुरु असते. मात्र आता त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी लावल्याने पुन्हा एकदा ही राजकीय चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संवाद यात्रेदरम्यान भुयार यांनी पाटील यांचे स्वागत करत थेट सभेच्या व्यासपीठावर हजेरी लावली आहे.
देवेंद्र भुयार हे मोर्शी मतदारसंघाचे आमदार आहेत. माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव त्यांनी केला आहे . स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कर्मभूमीत शिरोळ तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पराभव झाला असतानाच भुयार यांनी मात्र विदर्भात विजय मिळवला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.पुढे मंत्रिपद मिळण्याची देखील शक्यता निर्माण झाली होती मात्र काही कारणास्तव त्यांना मंत्रीपद मिळू शकले नाही.
महाविकास आघाडीचा धर्म जपत त्यांनी पाटील यांचे स्वागत केले असे सांगण्यात येत असले तरीही भुयार यांच्या या कृतीमुळे उलटसुलट चर्चा सुरु होणे स्वाभाविक आहे. राष्ट्रवादीच्या या पक्षांतर्गत संवाद यात्रेत भुयार यांनी सहभागी होण्याचं तसे काही कारण नाही मात्र त्यांची नाराजी अद्यापही कायम असल्यानेच ते या यात्रेच्या व्यासपीठावर दिसून आल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे स्वभिमानीच्या कार्यक्रमांना मेळाव्यांना,आंदोलनांना देखील भुयार काहीवेळा गैरहजर असल्याचेच दिसून येते.
#राष्ट्रवादीपरिवारसंवाद यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil यांनी अमरावती जिल्ह्यीतल मोर्शी विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेतली. मोर्शीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी महाविकास आघाडीचा धर्म जपत प्रदेशाध्यक्षांचे स्वागत केले. pic.twitter.com/KsCq67W0Pf
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 4, 2021
विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांची निवड करण्याची प्रक्रिया चांगलीच रखडली आहे.या निवडणुकीसाठी अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. यातच स्वभिमानीचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी हे सध्या विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार होतील अशी शक्यता आहे. जर शेट्टी आमदार झालेच तर त्यांना मंत्रिपद देखील मिळणार अशी शक्यता आहे.त्यामुळे हे सर्व पूर्वनियोजित होते का आणि यातूनच भुयार यांचे मंत्रिपद गेले का अशी शंका उत्पन्न होऊ लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अखेर शेतकरी आंदोलनावर समलमान खानने सोडले मौन, म्हणाला…
- विधान परिषदेवरील 12 जागांच्या निवडीची प्रक्रिया राज्यपाल जाणीवपूर्वक रखडवत आहेत ?
- प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होत असलेल्या नाना पटोले यांना ‘या’ आव्हानांचा करावा लागू शकतो सामना
- देशात शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला असताना मराठी कलाकार गप्प का ?
- ‘शेतकरी आंदोलनात माझ्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

