मुंबई : अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील, असे तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री विकसित करण्यावर आयआयटीच्या संशोधकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.
भुसे यांनी आज आयआयटी, मुंबई येथे भेट दिली. त्यांनी आयआयटीच्या रुरल टेक्नॉलॉजी अँक्शन ग्रुप, सितारा ग्रुपच्या प्राध्यापक, संशोधक यांच्याशी संवाद साधला. या ग्रुपच्या सहाय्याने शेती तंत्रज्ञानावर केल्या जात असलेल्या संशोधनाची माहिती घेतली, प्रकल्पांना भेट दिली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. आयआयटी, मुंबई येथील जलविहार सभागृह येथे ही बैठक झाली.
भुसे यांनी सांगितले की, राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता यावी यासाठी राज्य शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोरील समस्या सोडविण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी त्यांना उपयुक्त ठरतील आणि निविष्ठा खर्चात कपात होईल, असे तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री विकसित करण्यावर आयआयटीने भर द्यावा. असे मत भुसे यांनी यावेळी व्यक्त केले आहे. केले.
दरम्यान मुंबई येथे राज्याच्या कृषिमंत्री यांनी भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे प्रा. आनंद राव यांनी सांगितले. आयआयटी मधील संशोधनाचा शेतीच्या समस्या सोडविण्यासाठी उपयोग होऊ शकतो, असा विचार कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आमच्याकडे व्यक्त केला. ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. कृषी विभागासोबत काम करण्यासाठी निश्चितच आनंद होईल, असेही त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भटक्या समाजासाठी मोदींच्या पाया पडू, बावनकुळेजी घेऊन चला’; वडेट्टीवार यांची साद
- ‘सर्वसामान्य लोकांनी काय पाप केलंय? शिवसेना खासदार मागच्या दाराने सिद्धिविनायकाच्या दर्शनाला’
- ‘सत्तेच्या गैरवापराबद्दल सुप्रिया सुळेंनी त्यांच्या वडिलांना विचारावे’ ; चंद्रकांत पाटलांचा टोला
- रणरागिणीने फोडली डरकाळी; ‘…अशा लोकांना न घाबरता कारवाई सुरुच ठेवणार’
- ‘होय, हे स्वातंत्र्ययुद्धच ! रँड असाच वागायचा तेव्हा चाफेकर बंधुंनी आवाज उठवला; आताही…’


