Share

80 हजार लसी उपलब्ध असूनही ‘या’ जिल्ह्यात सिरींजचा तुटवडा असल्यानं लसीकरण बंद होण्याची वेळ

Published On: 

गोंदिया – गोंदिया जिल्ह्यात सध्या 80 हजार लसीच्या मात्रा उपलब्ध असून केवळ सिरींजचा तुटवडा असल्यानं ग्रामीण भागातील लसीकरण केंद्र बंद होण्याची वेळ आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालया अंतर्गत शहरात सुरु असलेल्या लसीकरण केंद्रांवर लस आणि सिरिंज उपलब्ध आहेत, मात्र जिल्हा आरोग्य विभागात सिरींजचा साठा संपत असताना आता लसीकरण केंद्र बंद होण्याची वेळ आली आहे. या विषयी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी फक्त जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व घडत असताना दुसऱ्या बाजूला राज्यात काल 8 हजार 196 रुग्ण कोरोना मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत एकंदर 62 लाख 9 हजार 364 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96 पूर्णांक 93 शतांश टक्के एवढं झालं आहे.

राज्यात काल 5 हजार 132 नवीन कोरोनाबाधित रुग्णांचं निदान झालं. तर कोविड-19 मुळं काल 158 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात सध्या 58 हजार 69 रुग्ण उपचाराधीन आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजे 12 हजार 904 इतकी आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!