Share

गोव्यात भाजपच्या विजयानंतर ; आज मुंबईत होणार फडणवीसांचे जल्लोषात स्वागत

Published On: 

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला असून भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उतरवणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, गोव्यातील भाजपच्या विजयाचे स्तंभ विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे आज (११ मार्च) मुंबईमध्ये येणार असून त्यांचा जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मुंबई विमानतळावर स्वागत करण्यात येईल. तद्पश्चात सकाळी साडेदहा वाजता त्यांचे भाजप प्रदेश कार्यालय येथे जल्लोषात स्वागत करण्यात येईल, तिथे फडणवीस भाषण करतील आणि त्यानंतर विधानभवनात येतील.

दरम्यान, काल भाजपच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की,‘मी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की शिवसेनेची लढाई आमच्याशी नाही तर नोटाशी आहे. तुम्ही पाहिलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची एकत्रित मतं पाहिली तरी ती नोटापेक्षा कमी आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी मोठी सभा घेतली होती. तिथे त्यांच्या उमेदवाराला 97 मतं मिळाली आहेत’. त्याचबरोबर काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. असा सल्लाही त्यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!