Share

शिवसेनेचा ‘राज्यमंत्री’ असूनही शहर प्रमुखांचा न्यायासाठी लढा!

Published On: 

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा आणि अवैध खनिज चोरी होत असून देखील तहसीलदार विक्रम राजपूत हे अशा अवैध चोरट्यांना पाठीशी घालत असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख रघुनाथ वाघमोडे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे राज्याच्या महसूल राज्यमंत्री पदाचा पदभार असतांना देखील शिवसेनेच्याच शहरप्रमुखांना न्यायासाठी झगडावे लागत असल्याने याबाबत शहरात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात सत्ता असणाऱ्या शिवसेनेच्या सिल्लोड शहर प्रमुखांनी सिल्लोडच्या तहसील कारभाराचे वाभाडे काढले आहेत. रघुनाथ घरमोडे यांनी विभागीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिल्लोडचे तहसीलदार विक्रम राजपूत यांच्याकडे अनेक वेळा सिल्लोड तालुक्यातील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सिल्लोड तालुक्यात सुरू असलेला अवैध वाळू उपसा संदर्भात तक्रार केली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी गौण खनिज खुलेआम चोरी होत असताना याकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी म्हणून अनेक वेळा तहसीलदार यांना निवेदने दिली.

परंतु विक्रम राजपूत हे अशा निवेदनाला केराची टोपली दाखवित असून त्यांचा कारभार हा संशयास्पद वाटत आहे. त्यामुळे उच्चस्तरीय समितीमार्फत त्यांची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. रघुनाथ गरड यांनी अशा प्रकारच्या मागण्या केल्या आहेत. विशेष म्हणजे सिल्लोडचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे राज्याच्या महसूल राज्यमंत्री पदाचा पदभार असतानादेखील शिवसेनेच्याच शहरप्रमुखांना न्यायासाठी झगडावे लागत असल्याने याबाबत शहरात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!