अमरावती: चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाना साधला आहे. शिवसेना फक्त मुंबईपुरती मर्यादित होती. मात्र भाजपचे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे
यांनी बोट धरून शिवसेनेला मराठवाड्यात आणलं. मात्र याच शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने विश्वासघात करत काँग्रेस, राष्ट्रवादीशी युती केली. त्यामुळे आम्ही स्वबळावर यंदाची निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
निकाल लागण्याच्या दिवशी ४ वाजता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होती. मात्र त्यावेळी त्यांनी तुम्ही तुमची पत्रकार परिषद करा मी माझी करतो असे म्हटले होते. त्यावेळीच काहीतरी लोचा असल्याचे समजत होते. त्यावेळी त्यांनी सर्व मार्ग मोकळे असल्याचे ठणकावून सांगितले. आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती केली. त्यामुळे याला विश्वासघातच म्हणतात असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
तसेच यावेळी त्यांनी अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईवरही प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख यांच्यावर विनाकारण कारवाई चालू नाही असेही ते म्हणाले आहेत. तर त्यांनी घातलेली दरोडे यानंतर पोलिसांची कारवाईच होणार त्यांना हार घालून त्यांचे स्वागत तर नाही केले जाणार असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा; न्यायालयाची सरकारला कायदा करण्याचा सूचना
- शाळा सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकारचा विचार सुरु; मुख्यमंत्री टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार निर्णय
- लवकरच भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला जेम्स बाँड सिरीजमधील २५ वा चित्रपट
- ‘उघड दार उद्धवा आता…’; मनसेचे मंदिरे उघडण्यासाठी पुण्यात जोरदार आंदोलन
- नाशिक : मंदिरे उघडावीत म्हणून आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात


