🕒 1 min read
मुंबई: सध्या अनेक लोक ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाईन ट्रांजेक्शन याचा अधिक वापर करताना दिसतात. मात्र याचाच फायदा अनेक सायबर गुन्हेगारांकडूनही घेतला जात असल्याच्या अनेक घटना आपल्या समोर आल्या आहेत. त्यामुळे सायबर सुरक्षेबाबत अधिक जागरूक होणं आवश्यक आहे.
बँकेचे व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने अगदी कमी वेळात सहज आणि वेगाने होतात. त्यामुळेच ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्याकडे हल्ली अनेकांचा अधिक कल असतो. इंटरनेट आणि स्मार्टफोन्समुळे बँकिंग खूपच सोपे केले आहे. मात्र सध्या ऑनलाईन फ्रॉड वाढले आहेत. यासाठी काही फसवणूक करणारे एसबीआयच्या नावाचा वापर करून ग्राहकांना मेसेज पाठवले जातात.
This message claiming that your @TheOfficialSBI account has been blocked is #FAKE #PIBFactCheck
▶️Never respond to emails/SMS asking to share your personal or banking details.
▶️If you have received any similar message, report immediately at report.phishing@sbi.co.in pic.twitter.com/eWQPqp2aXR
— PIB Fact Check (@PIBFactCheck) September 1, 2021
परंतु यामुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाते. अशा फ्रॉडपासून वाचण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने मोलाचा सल्ला दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांना वेळोवेळी सावध करत असते. यावेळी ही बँकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ग्राहकांना अलर्ट केलं आहे.
दरम्यान एसबीआयच्या नावाचा वापर करत चुकीच्या किंवा ज्याचा सोअर्स माहित नाही अशा लिंकवर क्लिक करण्यास सांगण्यात येते. त्यामुळे तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकते. याबाबत ग्राहकांना असा मेसेज केला जात आहे की, ‘प्रिय ग्राहक, तुमचे एसबीआय खाते ब्लॉक करण्यात आले असून तुमची कागदपत्र अपडेट करा. बँकेच्या वेबसाइटला भेट द्या. नेट बँकिंगच्या माध्यमातून अपडेट करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.’
या मेसेजमध्ये एक लिंक देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने जेव्हा या मेसेजची सत्यता पडताळून पाहिली, तेव्हा असं लक्षात आलं, की हा मेसेज खोटा आहे. तुम्हाला देखील असा मेसेज आला असल्यास report.phishing@sbi.co.in वर तक्रार दाखल करा.
महत्त्वाच्या बातम्या
- जे माजी मुख्यमंत्र्यांना जमलं नाही ते उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं
- प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी बोट धरुन सेनेला मराठवाड्यात आणलं- चंद्रकांत पाटील
- ‘सत्ताधाऱ्यांचा निष्काळजीपणा भोवला; तरुणाच्या अपघातानंतर महापालिकेला जाग’
- ‘उघड दार उद्धवा आता…’; मनसेचे मंदिरे उघडण्यासाठी पुण्यात जोरदार आंदोलन
- नाशिक : मंदिरे उघडावीत म्हणून आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
