Share

तलावरीचे गावात प्रदर्शन करणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

Published On: 

औरंगाबाद : अवैधरीत्या विनापरवाना तलवार बाळगून त्या तलावरीचे गावात प्रदर्शन करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी तलवारीसह ताब्यात घेतले असून आरोपी विरूध्द भारतीय हत्यार अधिनियम प्रमाणे फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई सापोनि प्रतापसिंह बहूरे यांच्या मार्गदर्शना वरुन पोउपनि युवराज शिंदे पो.अ ज्ञानेश्वर सरताळे मपोअ ज्योती परळे यांच्या पथकाने सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथे केली.

सलीम गंभीर तडवी (वय ३५ रा.पळसखेडा ता.सोयगाव) असे आरोपीचे नाव आहे. या बाबत पोलिस सुत्रांन कडून प्राप्त खात्रीशीर माहिती अशी की शुक्रवारी सायंकाळी फर्दापूर पोलिस ठाण्याचे पथक पळसखेडा येथे गस्त घालत असतांना पळसखेडा येथील सलिम गंभीर तडवी यांने विनापरवाना अवैधरीत्या तलवार बाळगली असल्याची व त्या तलवारीचे तो गावात खुलेआम प्रदर्शन करीत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून पोलिसांना प्राप्त झाली.

या माहितीच्या आधारे सापोनि प्रतापसिंह बहूरे यांच्या मार्गदर्शनावरुन पोउपनि युवराज शिंदे पो.अ ज्ञानेश्वर सरताळे मपोअ ज्योती परळे यांच्या पथकाने आरोपीच्या घरी जावून तपासणी केली असता आरोपीने विनापरवाना अवैधरीत्या बाळगलेली तलवार मिळून आली दरम्यान पोलिसांनी तलवारीसह आरोपीस ताब्यात घेऊन पो.अ धनराज खाकरे यांच्या फिर्यादी वरुन फर्दापूर पोलिस ठाण्यात आरोपी सलीम गंभीर तडवी विरूध्द भारतीय हत्यार अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!