नवी दिल्ली : ‘बाबा का ढाबा’ याची चांगलीच चर्चा मागील वर्षी झाली होती. लॉकडाउनमुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. याचा आर्थिक फटका ‘बाबा का ढाबा’ चे ८० वर्षीय मालक कांता प्रसाद आणि त्यांच्या पत्नी बदामी देवी यांना बसला याकाळात युट्यूबवर गौरव वासन याने यांचा एक व्हिडीओ शूट केला होता, ते पाहून लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
काही वेळातच लोकांनी त्यांच्या ढाब्यावर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी एक रेस्टॉरंटदेखील सुरु केलं होतं. मात्र इतक सगळ चांगले होऊन ही पुन्हा त्यांच्या नशिबी तोच ढाबा सुरु करण्यची वेळ आली आहे. ‘दिल्लीतील कोरोनामुळे त्यांचा जुना ढाबा १७ दिवस बंद ठेवावा लागला, त्यामुळे विक्रीवर परिणाम झाला. पुन्हा त्यांच्यावर पूर्वीसारखीच परिस्थिती ओढवली होती.
या परिस्थितीच्या त्रासातून बाबा का ढाबा चालवणारे कांता प्रसाद यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. कांता प्रसाद यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मिळलेल्या माहितीनुसार कांता प्रसाद यांनी मद्यप्राशन करून झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कांता प्रसाद यांना उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्यात पाऊसाचे ‘काळे’ ढग ; सामन्याचं पहिलं सत्र गेलं वाया
- ‘तुम्ही काळजी करू नका, आमचं व्यवस्थित सुरुये!’, आघाडीत बिघाडीच्या चर्चेवर अजितदादांचे स्पष्टीकरण
- नितीन गडकरींना धक्का! अमरावतीचे डॉ.सुनील देशमुख काँग्रेसमध्ये
- पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते विविध विकासकामांना प्रारंभ, नव्या बससेवेचेही उद्घाटन
- नताशा, देवांगना, आसिफला मिळालेला जमीन सरकारच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

