मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण सुरु झाले आहे. अशावेळी मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने पुढाकार घेऊन आरक्षण द्यावे अशी मागणी राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे.
यामुळेच आता खासदार संभाजीराजे छत्रपती हे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असल्याचे चित्र सध्या पाह्यला मिळत आहे. सध्या संभाजीराजे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून विविध भागांमध्ये समाज बांधवांच्या भेटी व बैठक घेऊन त्यांच्या भावना समजावून घेत आहेत.भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संभाजी छत्रपती यांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘ मी सकल मराठा समाजाच्या वतीने मी बोलत आहे. कोणत्या पक्षाच्या वतीने किंवा राजकीय भूमिका घेऊन बोलत नाही. मी महाराजांचा वंशज आहे. 1917 ला शाहू महाराज म्हणाले की मी मराठ्यांचं नेतृत्व करत नाही तर मी शिपाई म्हणून नेतृत्व करायला आलो आहे. आता आपण सामाजिक मागास राहिलेलो नाही. ऑगस्ट 2017 मध्ये मी आझाद मैदानात स्टेजवर गेलो आणि भूमिका घेतली कारण त्या ठिकाणी जातीय तेढ निर्माण होणार होती. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला तो सर्वोच्च होता. मी त्यावेळी भूमिका घेतली माझ्यावर टीका झाली. आम्हाला भांडण करण्यात घेणंदेणं नाही आम्हाला न्याय पाहिजे. समाजाला वेठीस धरू नका, असं ते म्हणाले.
यावेळी संभाजीराजे यांनी सर्वांना भावनिक साद देखील घातली आहे. ते म्हणले कि, ‘ छत्रपती घराण्याचा वंशज हात जोडून विनंती करतो या समाजाला बाहेर फेकू नका. एकत्रित येवूयात आणि समाजाला न्याय देवूयात.’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच खासदार संभाजीराजे म्हणाले की, ‘आम्हाला कुणाच्या भांडणाशी देणंघेणं नाही, आमच्या मराठा समाजाला न्याय द्या. कोणत्या पक्षाच्या वतीने किंवा राजकीय भूमिका घेऊन बोलत नाही. मला कोणत्याही पक्षावर टीका करायची नाही, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. आरक्षणाच्या प्रश्नामुळं मराठा समाज अस्वस्थ आहे. मी असल्यामुळं मराठा समाज शांत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुन्हा उसळणार : शरद पवार ६ जूनच्या आंदोलनाला येणार ? संभाजीराजे म्हणाले…
- दिलासा…औरंगाबादेत पॉझिटिव्हीटी रेट २.२७ टक्क्यांपर्यंत खाली, तर रिकव्हरी रेट ९६.४० टक्क्यांवर!
- पुण्यातील लॉकडाऊनमध्ये मोठा बदल, राजेश टोपेंनी केली घोषणा
- अखेर स्मार्ट सिटी बसला मिळाला मोबदला, १ कोटी ७० लाख आले, ८ लाख बाकी!
- मुख्यमंत्र्यांना ६ जून पर्यंतचा अल्टिमेटम; ‘या’ पाच गोष्टी मान्य न केल्यास शिवराज्याभिषेक दिनापासून आंदोलन !


