मुंबई : आज दिवसभराच्या चर्चानंतर अखेर अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांच्यासमोर आजवर घडलेल्या घटनाक्रमाची सविस्तर माहिती सादर केली, आणि आपली बाजू मांडली.
नुकतच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. शरद पवार यांच्या भेटीनंतर किरण माने यांनी पहिल्या प्रतिक्रियेत म्हणाले, राजकीय भूमिका आणि महिलेने केलेली तक्रार दोन्ही विषयी मी पवारांशी बोललो. एका महिलेने केलेला आरोप आणि त्यांच्या तक्रारीसंबंधीचीही माझी काही डाक्युमेंट आहेत. ही सगळी माहिती मी शरद पवारांकडे सादर केली. माझी बाजू मांडून दाखवली. त्यांनी शांतपणे ऐकुण घेतले. बघू, आता ते काय करतायत याच्यावर, असे ते म्हणाले. यावर शरद पवारांची काय प्रतिक्रिया असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान अभिनेते किरण माने यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अचानक काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांना व्यावसायिक कारणातून काढल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. मात्र, सोशल मीडयावर बरीच मते व्यक्त केली जात आहे. लोकांनी माने यांना पाठिंबा दर्शवला असून भाजपवर टीका केली जात आहे. तर दुसरीकडे माने यांनी दोन ओळींची फेसबुक पोस्ट टाकत माघार घेणार नाही तर लढत राहीन असे सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी “काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा…गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा,” असे म्हणत मते व्यक्त करतच राहणार अशी भूमिका घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या:
नायलॉन मांजामुळे ‘करकोचा’ने गमावला जीव; प्राणिसंग्रहालयाच्या परिसरात झाले अंत्यसंस्कार!
पंतप्रधानांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “प्रत्येकाने…”
- “नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही…”, फडणवीसांची शरद पवारांवर टीका
- “…म्हणजे सांस्कृतिक दहशतवादाला बळी पडल्याचे लक्षण”,किरण मानेंच्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंची टीका
- नाशिकच्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण; हायव्होल्टेज तारेचा धक्का लागल्याने तीन जवानांचा मृत्यू


