🕒 1 min read
मुंबई : मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपाकडून सर्वतोपरी तयारी केली जात असतनाच दुसरीकडे या निवडणुकीत शिवसेना 150 जागांवर निवडूण येणार, असा दावा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
यावर फडणवीस म्हणाले कि, यामध्ये गैर काही नाही पण जनतेच्या मनात काय आहे? याचे भान असणेही गरजेचे असल्याचे म्हणले आहे. यावरुन निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला नसला तरी राजकीय कलगीतुरा पाहवयास मिळत आहे. तसेच दुसरीकडे भाजप आणि मनसेची युती होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. पण या चर्चा केवळ सोशल मिडियामधून होत आहेत. प्रत्यक्षात ह्या राजकीय भेटी नसल्याचे पुन्हा स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यामुळे मनसे-भाजप युती होणार की नाही हे अद्याप तरी सांगता येणार नाही.
किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या ?
राजकीय नेत्यांनी आपली भूमिका बदलली असली तरी शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनते सेनेबरोबरच आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूकांमध्ये शिवसेना 150 जागांवर विजय खेचणार हाच उद्देश घेऊन रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले होते. शिवाय ज्यांनी पक्षप्रमुख यांच्याशी गद्दारी केली त्यांच्याबद्दल जनतेच्या मनात तीव्र भावना आहेत. आगामी निवडणूकांमध्ये ते दिसूनच येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Bhaskar Jadhav | “मुंबई महापालिकेसाठी भाजप दंगल घडवेल”
- Narendra Modi | “अर्ध्या तासात नरेंद्र मोदी यांचा फोटो लावा”; …अन् अर्थमंत्री चांगल्याच भडकल्या
- Ajit Pawar | “राज कपूर आधी शोमॅन म्हणून ओळखला जायचा, आता…”, भर कार्यक्रमात अजित पवार यांची टोलेबाजी
- Sharad Pawar | शिंदे-ठाकरे वादात शरद पवार यांची उडी?, सबुरीचा सल्ला देत म्हणतात, ‘डोन्ट फाईट…’
- Abdul Sattar । आगामी काळातील सर्व निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नावाने होतील – अब्दुल सत्तार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

