🕒 1 min read
मुंबई : आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातातवरण चांगलंच ढवळून गेलं आहे. कोणता पक्ष कोणत्या पक्षाशी युती करणार याच्याही चर्चा फार रंगल्या असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचप्रमणाने मुंबई महानगपालिकेची निवडणुकही काही दिवसांमध्ये होईल. त्यासाठी राज्यातील राजकीय पक्ष तयारीला लागले असल्याचं समजतं आहे. अशातच याच मुद्यावरून शिवसेना पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजप पक्षावर निशाणा साधला आहे.
भास्कर जाधव यांचे वक्तव्य-
देशात दंगली घडवण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे. त्यामुळे मुंबई पालिकेसाठी भाजप दंगल घडवेल असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.भास्कर जाधव गुहागर मधील शिवसेना मेळाव्यात भास्कर जाधव उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
जाधवांचे भाजपवर आरोप-
भाजपाने महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी नवनीत राणा यांना पुढे केलं. त्याचबरोबर सुशांतसिंग राजपूत, कंगना राणावत अशी अनेक नावे घेतली. भाजपने आत्तापर्यंत अनेक नेत्यांना ईडीची भीती दाखवली आहे. तसेच राजकारण तापवत असताना कुणाच्या हातात हनुमान चाळिसा दिली, असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला आहे.
तसेच, भास्कर जाधव म्हणाले की महाराष्ट्रात आमचं सरकार आलं आणि हिंदुचे सगळे सण साजरे व्हायला लागले आहेत असा अप्रचार सध्या राज्यात सुरु आहे. कारण कोरोनाच्या काळात आमच्या सरकारने संसर्ग अधिक पसरु नये म्हणून आमच्या सरकारनी निर्बंध लादले होते.
महत्वाच्या बातम्या :
- Sharad Pawar | शिंदे-ठाकरे वादात शरद पवार यांची उडी?, सबुरीचा सल्ला देत म्हणतात, ‘डोन्ट फाईट…’
- Abdul Sattar । आगामी काळातील सर्व निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नावाने होतील – अब्दुल सत्तार
- Narayan Rane | दोन शिवसैनिक एकत्र दिसणार?, नारायण राणे यांच्या उत्तराने शिंदेंच्या चेहऱ्यावर हास्य खुललं, म्हणाले…
- Ashish Shelar | आम्ही ‘पेंग्विन सेना’ म्हणायचं का?; आशिष शेलार यांचं थेट उद्धव ठाकरे यांना पत्र
- Ajit Pawar | भाजप-मनसे युतीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
