🕒 1 min read
अहमदनगर : एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यानंतर फक्त शिवसेनेलाच नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला देखील आपली सत्ता गमवावी लागली. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मोठमोठ्या घोषणाबाजी पहायला मिळाली. एकनाथ शिंदे यांनी आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न केला. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. अशातच आता अजित पवारांनी आपल्या खास शैलीत पुन्हा एकदा एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधलाय.
अजित पवार म्हणतात एकदम ओक्के
एकनाथ शिंदे नेत्यांच्या निवासस्थानी भेट देऊन दर्शन घेत आहेत. याच मुद्द्यावरून अजित पवारांनी भर कार्यक्रमात टीका केली. गणेशभक्ताला अशा पद्धतीने देखावा करण्याचं काही कारण नाही. तुम्ही देव तुमच्या मनात ठेवा ना. पण आता काहींना शो करण्याची सवय लागलीये. राज कपूर पूर्वी शोमॅन म्हणून ओळखला जायचा. तशी सवय काहींना आता लागली आहे. जनतेनेच बघावं काय चाललंय आणि काय नाही, असा टोला अजित पवारांनी यावेळी लगावला.
नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातील एका कार्यक्रमात अजित पवारांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी एकदम ओक्के म्हणत शिंदे सरकारचे कान टोचले. हल्ली राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही, असं अजित पवार म्हणाले. 20 जूनपर्यंत आम्ही सगळे सोबत होतो, अचानक त्यांच्या मनात काय आलं, अन् 15 आमदार घेऊन निघून गेले…, आता तुम्ही.. हे एकदम ओक्केच झालं.. काय आता बोलायचं?, अशी जहरी टीका देखील त्यांनी केली.
एकनाथ शिंदे राज ठाकरे भेटीवर टीका
आम्हीही अनेक ठिकाणी गणपतीच्या दर्शनाला जातो. पण आम्ही कॅमेरे बरोबर घेऊन जात नाही. पण आता प्रवेश करताना कॅमेरा लावला जातो. मग तिकडे बरोबर गाडी थांबते, कुणीतरी उतरतं. ते आत जातात. नमस्कार करतात…. कशाला?, असं म्हणत अजित पवारांनी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर नाव न घेता टीका केली.
महत्त्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | शिंदे-ठाकरे वादात शरद पवार यांची उडी?, सबुरीचा सल्ला देत म्हणतात, ‘डोन्ट फाईट…’
- Abdul Sattar । आगामी काळातील सर्व निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नावाने होतील – अब्दुल सत्तार
- Narayan Rane | दोन शिवसैनिक एकत्र दिसणार?, नारायण राणे यांच्या उत्तराने शिंदेंच्या चेहऱ्यावर हास्य खुललं, म्हणाले…
- Ashish Shelar | आम्ही ‘पेंग्विन सेना’ म्हणायचं का?; आशिष शेलार यांचं थेट उद्धव ठाकरे यांना पत्र
- Ajit Pawar | भाजप-मनसे युतीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
