Share

Narendra Modi | “अर्ध्या तासात नरेंद्र मोदी यांचा फोटो लावा”; …अन् अर्थमंत्री चांगल्याच भडकल्या

Published On: 

🕒 1 min read

हैदराबाद : नाकापेक्षा मोती जड, अशी उपहासात्मक टीका अनेकदा विरोधक केंद्रावर करताना पहायला मिळतात. कामापेक्षा मोदी सरकार पब्लिसिटीवर जास्त खर्च करतं, असं काँग्रेस नेत्यांनी संसदेत टीका करताना म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या कोरोना लस प्रमाणपत्रावरचा फोटो असो किंवा खासगी कार्यालयात, अनेकदा फोटोवरून वाद पेटल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेशन दुकानमध्ये फोटो नसल्याने चांगल्याच भडकल्याचं पहायला मिळालं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो का नाही?

अर्थमंत्री सध्या तेलंगाणाच्या दौऱ्यावर आहेत. भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेच्या अंतर्गत निर्मला सीतारमण यांनी कामारेड्डी जिल्ह्यातील बिरकुर या ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील एका रेशन दुकानात उभ्या असलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना रेशन दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोटो नसल्याचं दिसून आलं. त्यानंतर सितारामण यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो दुकानात का नाही?, असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून सर्वांना पाच किलो तांदूळ मोफत दिला जातो. मात्र, तेलंगणातील सरकार रेशन दुकानांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंचे फोटो लावत नाही. पंतप्रधानांचे बॅनर लावले जातात, तेव्हा ते फाडण्यात येतात, असं म्हणत अर्थमंत्र्यांचा पारा चढला. केंद्र सरकार 30 रूपये खर्च उचलतं, तर राज्य सरकारच्या वाट्याला फक्त 4 रूपये खर्च येतो, असं म्हणत त्यांनी तेलंगाणा सरकारवर टीकास्त्र सोडलं.

अधिकाऱ्यांना दिली तंबी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दुकानात का नाही?, याचं उत्तर जिल्हाधिकाऱी आणि अन्य उपस्थित अधिकाऱ्यांकडे नव्हतं. त्यामुळे अर्थमंत्री सीतारमण यांनी अर्ध्या तासात फोटो लावण्याची तंबीच दिली. अर्थमंत्र्यांचं वक्तव्य पंतप्रधानांचा दर्जा खालावणारं आहे, हा सर्व प्रकार हास्यास्पद असल्याचं तेलंगाणा सरकारने म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!