पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
मात्र, अनेक ठिकाणी गर्दी आटोक्याबाहेर गेल्याच चित्र समोर आलं आहे. त्यामुळे नक्की संचारबंदी आहे की नाही ? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी भाजीपाला, किराणा व इतर आवश्यक सुविधा सुरु ठेवण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील नागरिक किराणा दुकानाबाहेर, भाजी मार्केटमध्ये, लोकलमध्ये मोठी गर्दी करत असल्याने नियम अधिक कठोर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर कोरोनाची वाढती संख्या पाहता पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना मागच्यासारखा कडक लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत.
‘दुसऱ्या लाटेत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आम्ही कठोर निर्णय घेतला आहे. रुग्ण वाढल्यामुळे असे निर्णय घेण्याची वेळ आली. याला सर्वांनी व्यवस्थित प्रतिसाद दिला नाही. तर मागच्यासारखा कडक लॉकडाऊन लावावा लागेल. त्यामुळे तशी वेळ येऊ देऊ नये अशी आम्ही विनंती करतो’. अस अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, आजच्या बैठकीमध्ये आमदार निधीमधील एकूण रकमेपैकी 1 कोटी रुपये कोरोनासाठी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. निधीची कमतरता पडता कामा नये. जवळपास मुख्यमंत्र्यानी साडे पाच कोटींचं पॅकेज जाहीर केलं. त्यापैकी 3300 कोटी रुपये कोरोनाच्या कामासाठी खर्च करण्यासाठी परवागनी देण्यात आली आहे. कोरोनाविरोधात लढण्याासाठी राज्यातील सर्व मतदारसंघात एकूण 350 कोटी रुपये खर्च करण्यासाठी तत्काळ मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टर आज मध्यरात्री पासून जाणार संपावर
- कार्यालयात महिलांचा लैगिंक छळ होऊ नये यासाठी महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी केल्या ‘या’ सूचना!
- आमदार निधीतून कोरोना खर्चासाठी 350 कोटी रुपये खर्चाला मान्यता, अजित पवारांची मोठी घोषणा
- खासदार इम्तियाज जलील यांच्यासह उस्मानपुरा प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी
- अखेर निरव मोदीला भारतात आणणार , ब्रिटनच्या गृहमंत्र्यांची प्रत्यार्पणास मान्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

