Share

आमदार निधीतून कोरोना खर्चासाठी 350 कोटी रुपये खर्चाला मान्यता, अजित पवारांची मोठी घोषणा

Published On: 

पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तर शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन असणार आहे.

कोरोनाची वाढती संख्या पाहता पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना ‘आजच्या बैठकीमध्ये आमदार निधीमधील एकूण रकमेपैकी 1 कोटी रुपये कोरोनासाठी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली’ असल्याची माहिती दिली आहे.

देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तशीच स्थिती महाराष्ट्राची आहे. त्यामुळे आगामी काळात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, औषधांची, बेड्सची, ऑक्सिजनची, रेमेडिसिव्हीरची कमतरता कशी भासणार आहे, याबाबत प्रयत्न सुरु आहेत. रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बातचित केली. अंबानी यांनी काही प्रमाणात ऑक्सीजन उपलब्ध करुन देण्याचे कबूल केले आहे. अस अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, आजच्या बैठकीमध्ये आमदार निधीमधील एकूण रकमेपैकी 1 कोटी रुपये कोरोनासाठी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. निधीची कमतरता पडता कामा नये. जवळपास मुख्यमंत्र्यानी साडे पाच कोटींचं पॅकेज जाहीर केलं. त्यापैकी 3300 कोटी रुपये कोरोनाच्या कामासाठी खर्च करण्यासाठी परवागनी देण्यात आली आहे. कोरोनाविरोधात लढण्याासाठी राज्यातील सर्व मतदारसंघात एकूण 350 कोटी रुपये खर्च करण्यासाठी तत्काळ मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!