Share

खासदार इम्तियाज जलील यांच्यासह उस्मानपुरा प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी

Published On: 

औरंगाबाद : उस्मानपुऱ्यातील प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्यांच्या वर तत्काळ कारवाई करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पोलीस आयुक्त डॉ निखील गुप्ता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे शहर अध्यक्ष बाळासाहेब थोरात, किशोर नागरे यांची उपस्थिती होती.

दोन दिवसांपूर्वी उस्मानपुरा भागात सलून चालकाचा मृत्यू झाला होता. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी पोलीस ठाण्यात येऊन प्रकरणाला कलाटणी देण्याचा आरोप देखील त्यांनी केला. खासदारांसह तिथे आलेल्या लोकप्रतिनिधी आणि प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळत पोलिसांची बदनामी करत पोलीस दलाचे मनोधैर्य कमी करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करायची मागणी त्यांनी केली.

राज्यात वाढत असलेली कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने आणि जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद केलेले आहे, तरीही शहरातील उस्मानपुरा भागात एक सलूनचालकाने बेकायदेशीर रित्या दुकान सुरु ठेवल्याने संबंधित भागातील पोलीस प्रशासनाने दुकान बंद करण्याचे सांगत असताना सलून चालकाचा चक्कर येऊन पडल्याने व डोक्याला मारलागल्याने दुःखद निधन झाले.

पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेला नाही हे CCTV मध्ये स्पष्ट दिसत असतानाही नेहमी प्रमाणे विषयाला राजकीय आणि धार्मिक वळण देऊन संबंधित लोकांनी कोरोना काळातील जमावबंदी चे निर्बंध जुगारून जनतेला गर्दी करण्यास प्रवृत्त करून व पोलिस प्रशासनास वेठीस धरल्याने काही काळ शहरातील वातावरण तणावाचे बनवले होते व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करून त्यांची बदली करण्यास भाग पाडले, तपास होण्याआधीच अश्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यास प्रशासनाचे मनोबल कमी होईल, अशी शक्यता यातून निर्माण होत आहे.

शवविच्छेदन अहवालात ही मृत्युचे कारण स्पष्ट झाले आहे त्यामुळे अश्या बेजबाबदार लोकप्रतिनिधीवर, लोकांवर योग्य ती कारवाई करून, ही घटना लोकांना पोलिसांबद्दल चीड कशी व्यक्त करता येईल ह्या हेतूने सोशल मीडियावर पसरवलेल्या व्यक्तीवरही कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून अशा घटना नेहमी नेहमी घडणार नाही. असे निवेदनात म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!