नवी दिल्ली : विदर्भ पाठोपाठ मराठवाड्यातील शेतकरी सततच्या नापिकीमुळे कंटाळलेला आहे. लहरी निसर्ग चक्रामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी आहे. अशातच अवकाळी तर कधी दृष्काळ यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहते. त्यावर पीक विमा हा एक पर्याय असला तरी त्यातही कंपन्या अडवणूक करत आहे. त्यावर उपाय काढण्याची मागणी खासदार डॉ. भागवत कराड यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे केली आहे.
खासदार डॉ. कराड यांनी दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेतली. गेल्या पाच वर्षांचा विचार केला तर मराठवाड्यात दोन ते तीन वर्ष दुष्काळ होता. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. त्यातच पिक विमा कंपन्यांच्या जाचक अटींमुळे त्यांना विम्याचा लाभ भेटत नाही. शेतकऱ्यांना हा पैसा मिळावा याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मात्र, राज्य सरकार त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालण्याची मागणी डॉ. कराड यांनी केली आहे.
औरंगाबादसह मराठवाड्यातील अनेक शेतकरी पिक विम्यापासून वंचित आहे. त्यांना पिक विम्याचा योग्य लाभ मिळाल्यास काही प्रमाणात दिलासा मिळेल. केंद्र सरकार असो की, राज्य सरकार दोहोंच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणे महत्त्वाचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपला ‘शिवप्रसाद’ देणाऱ्या शिवसैनिकांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप !
- शिर्डीचे साईमंदिर कधी उघडणार? खा.सुजय विखे म्हणाले..
- राम मंदिरासाठीच्या निधीबाबत राष्ट्रवादीकडूनही चिंता, केली ‘ही’ मागणी
- ‘आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार’, चंद्रकांत खैरेंची माहिती
- ‘झारीतील शुक्राचार्य नेमके कोण? मराठा समाजाच्या मागण्या का मान्य होत नाहीत?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

