Share

गरिबांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करा, सोनिया गांधींचे मोदींना पत्र

Published On: 

नवी दिल्ली- देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील अनेक दिवसांपासून काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला असून दुसरीकडे रुग्ण वाढत असल्यामुळे औषधांचा तुटवडासुद्धा जाणवतो आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. त्यांनी या पत्रात पंतप्रधान मोदींकडे तीन मागण्या केल्या आहेत. यामध्ये योग्य पात्रता असलेल्या सर्व लसींना परवानगी द्या, कोरोनाशी संबंधित सर्व मेडिकल वस्तूंवर चा जीएसटी माफ करा तसेच पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. पण असं करण्याआधी सहा हजार रुपये गरिबांच्या खात्यात जमा करा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.

सोनिया गांधी आपल्या पत्रात म्हणाल्या की, राज्यांना लस पुरवताना त्या त्या राज्यातल्या सक्रिय रुग्णांची संख्या आणि भविष्यातला संभाव्य ग्राफ लक्षात घेऊन पुरवठा राज्यांना करण्यात यावा. कोरोनाशी संबंधित सर्व मेडिकल वस्तूंवरचा जीएसटी माफ करा. सध्या वेंटीलेटर, ऑक्सीजन सिलेंडर यासह रेमडिसिविर आणि इतर औषधांवरही जीएसटी लागू होतो. पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. पण असं करण्याआधी सहा हजार रुपये गरिबांच्या खात्यात जमा करा अशी मागणी केली आहे.

काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यांच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर सोनिया गांधी यांनी हे पत्र पाठवलं आहे. बैठकीत त्यांनी राज्यातील परिस्थिती तसंच लसींची उपलब्धता, व्हेटिंलेटर आणि औषधांच्या सुविधेची माहिती घेतली होती. बैठकीत पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगडने आपल्याकडे लसींचा मर्यादित साठा असल्याचं सांगत केंद्राने तो पुरवठा वाढवावा अशी मागणी केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!