नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह गैरभाजपाशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिले आहे. या पत्रातून “तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे. त्यामुळे भाजपविरोधात एकत्र या”, असं आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
तसेच त्या म्हणाल्या देशात सूडाचं राजकारण सुरू आहे. त्यानुसार ईडी, सीबीआय, आयबी, इन्कम टॅक्ससह विविध यंत्रणांचा राजकीय वापरासाठी चुकीचा वापर होत आहे, असं सांगत या प्रकारावर ममता बॅनर्जी यांनी चिंताही व्यक्त केली आहे. तसेच या मुद्द्यावर विरोधी पक्षांची एक बैठक होण्याची गरज आहे. या बैठकीतल पुढील वाटचाल आणि रणनीतीवर चर्चा केली गेली पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.
ममता बॅनर्जी यांनी काल 27 मार्च रोजी हे पत्रं लिहिलं आहे. तृणमूल काँग्रेसने आज हे पत्रं मीडियासमोर आणलं. या पत्रातून तपास यंत्रणाचा होणाऱ्या गैरवापरावर चिंता व्यक्त करतानाच हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. भाजपच्या हुकूमशाही सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. असं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
“नाणारमध्ये रिफायनरी होणार नाही” – आदित्य ठाकरेंची भूमिका
विराजस–शिवानीने गुपचुप उरकले लग्न? व्हिडीओ होतोय व्हायरल
IPL 2022 : अरेच्चा! लखनऊच्या ‘बेबी एबी’ ने केलेल्या ‘या’ विक्रमाची त्याला साधी कल्पनाही नव्हती
“विखेंना भाजपमध्ये मान मिळतो की नाही…” – छगन भुजबळांचा विखेंना टोला
“…याचे उत्तर ६४० कसं येतं डॉक्टर नितीन राऊत साहेब?”, आधुनिक भास्कराचार्य म्हणत भातखळकरांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

