Share

एसटी कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी चुकीची-पन्नालाल सुराणा

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी बस सेवा बंद ठेवली आहे. भाजपनेही यात सक्रिय सहभाग घेत कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. एकीकडे उच्च न्यायालयाने संप थांबविण्याचा आदेश दिलेला आहे, तर दुसरीकडे संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे.

यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘काही राजकारण्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून संप ताणला आहे. संप ताणून पूर्वी गिरण्या बंद पाडल्या. आता रेल्वेचे खासगीकरण करणाऱ्या केंद्र सरकारच्या नेत्यांनी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांना सरकारमध्ये सामील करा, अशी मागणी करताना नेमके कोण कोणते कटकारस्थान रचत आहे, याचा विचार एसटीच्या कर्मचाऱ्यांनी डोळसपणे केला पाहिजे, असे आवाहन करत शासनात विलीन करण्याची मागणी अतिशय चुकीची आहे, असे मत सुराणा यांनी व्यक्त केले.

शासनाने अनेक वर्षांपूर्वी स्वायत्त महामंडळ उभे करण्याचे मूळ कारण म्हणजे त्याची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींचा निपटारा हा आहे. एखादी वस्तू खरेदी करताना सरकार दरबारी असणाऱ्या वित्त विभागात अनेक दिवस कागद अडकतात, ते थेट विधिमंडळ मागणीपर्यंत असतात असेही ते म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचे कमी पगारात भागणे अशक्य आहे. पण, त्याकरता त्यांनी चुकीच्या मार्गाने मागणी करत आपले नुकसान करून घेऊ नये. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आता हा संप जास्त ताणू नये, असेही पन्नालाल सुराणा यांनी आवाहन केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!