औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांवर अतिरिक्त कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु सदरील कोरोना सर्वेक्षणासाठी सुरक्षा सुविधा न दिल्याने शिक्षकांमध्ये असंतोष दिसत आहे. या पार्श्वभूमीवर विमा सुरक्षा देण्याची मागणी शिक्षक समितीने केली आहे.
वर्षभरापासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाच्या अनुषंगाने शिक्षकांवर अतिरिक्त कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामध्ये घरोघरी जाऊन कुटुंब सर्वेक्षण, चौकातील वाहनांची तपासणी, स्वस्त धान्य दुकानांचे पर्यवेक्षण, कोवीड सेंटरवर चौकशी अधिकारी अशा विविध कामासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
या कामासाठी आवश्यक असणारे विमासुरक्षा कवच यावर्षी शिक्षकांसह आशा वर्कर्स,अंगणवाडी सेविका,यांना शासनाकडून देण्यात आले नाही. मागील वर्षीचा विमा सुरक्षा कवचाची मुदत ३० सप्टेंबर २०२० लाच संपली आहे. त्यास मुदतवाढ देऊन नवीन विमा सुरक्षा कवच प्रदान करुन तसा शासनाने लेखी आदेश जारी करावा. सोबतच सॅनिटायझर, मास्क, थर्मलगन,ऑक्सीमिटर, पीपीईकीट तसेच इतर आवश्यक साहित्य सुद्धा पुरविले जात नाही.
वर्षभरात सदरील कामावर कर्तव्य बजावताना अनेक शिक्षकांचा जीव गेला आहे. या महिन्यात कर्तव्य बजावतांना ७५ % शिक्षक कोरोना बाधीत आढळून आले आहेत. त्या संबंधितांच्या कुटुंबीयांना विम्याचा लाभ मिळालेला नाही. शिक्षक वर्गाला सुरक्षा सुविधा सुरक्षा कवच तात्काळ पुरविण्यात यावे अशी भूमिका प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, सरचिटणीस रंजित राठोड, नितीन नवले, श्याम राजपूत यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपने परमबीर सिंग यांना गृहमंत्र्यांवर खोटे आरोप करायला लावले, मिटकरींचे गंभीर आरोप
- मोठी बातमी :आदित्य ठाकरेंना यांना कोरोनाची लागण
- बादशाह को बचाने में कितनो की जाने जाएगी’? अमृता फडणवीस यांचा घणाघात
- तृतीयपंथीयांना स्मार्ट सिटी अभियानात मिळणार नोकरी, मे अखेरपर्यंत भरती प्रक्रिया
- ‘पोलिस प्रशासन व सरकारच्या कारभाराकडे पाहून वाटतंय राज्य संकटात आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

