मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.
मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. एका वृत्तवाहिनीने हा दावा केला आहे.
माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा दावा केला आहे. या पत्रात परमबीर सिंग म्हणतात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं. महिन्याला इतकी मोठी रक्कम बार, रेस्टॉरंट आणि अन्य संस्थांकडून वसुली करायची होती. असा धक्काद्दायक खुलासा माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेला आहे.
यावरून आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरलं आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. ‘राजकारणातील गुन्हेगारीकरण हा विषय परत ऐरणीवर आला की काय हे आताच्या गृह विभाग, पोलिस प्रशासन व सरकारच्या कारभाराकडे पाहून वाटत आहे. राज्य संकटात आहे’. असा घणाघात पंकजा मुंडे यांनी केला आहे.
राजकारणातील गुन्हेगारीकरण हा विषय परत ऐरणीवर आला की काय हे आताच्या गृह विभाग, पोलिस प्रशासन व सरकारच्या कारभाराकडे पाहून वाटत आहे. राज्य संकटात आहे.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 20, 2021
दुसरीकडे भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘अनिल देशमुख यांनी वाझेंना वसुलीच काम दिलं होतं का? हे महाविकास आघाडीने स्पष्ट करावं तसेच संशयित असलेल्या अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा’. अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
अनिल देशमुख यांनी वाझेंना वसुलीच काम दिलं होतं का? हे महाविकास आघाडीने स्पष्ट करावं तसेच संशयित असलेल्या अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. @BJP4Maharashtra #ParambirSinghLetter
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) March 20, 2021
तर ‘महाराष्ट्र पोलिसांत अशाप्रकारची अराजकता यापूर्वी कधीच नव्हती. परमबीर सिंहांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे महाराष्ट्र सरकारची अब्रू वेशीला टांगली आहे’. असा घणाघात देखील दरेकर यांनी केला आहे.
महाराष्ट्र पोलिसांत अशाप्रकारची अराजकता यापूर्वी कधीच नव्हती. परमबीर सिंहांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे महाराष्ट्र सरकारची अब्रू वेशीला टांगली आहे. @BJP4Maharashtra #ParambirSinghLetter
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) March 20, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारला अजून एक धक्का; मनसुख हिरन मृत्युप्रकरणाचा तपास NIA कडे
- ‘अब बात निकल ही गई है तो फिर दूर तलक जायेगी’, चित्रा वाघांचा ठाकरे सरकारवर निशाणा
- अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, दरेकरांची मागणी
- एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लॉकडाउनमध्येही धावणार स्मार्ट सिटी बस
- ‘नितीन राऊत साहेब…उच्च राहणीमानाचा खर्च स्वतः च्या खिशातून करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

