मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा वाढतच आहे. सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.यातून सरकारचे मंत्री सुद्धा वाचले नाहीत. यातच अजून एका मंत्र्याला कोरोनाने आपल्या विळख्यात घेतल आहे. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण झाली आहे.
आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली. त्यांनी संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आणि चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे. कायम मास्क घालण्याचं आणि स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
‘माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.’ अस ट्विट आदित्य ठाकरेंनी केल आहे.
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 20, 2021
दरम्यान, आत्तापर्यंत जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ, बच्चू कडू, नितीन राऊत, एकनाथ शिंदे, अनिल परब मंत्र्यांनाही करोनाची बाधा झाली होती. त्यापाठोपाठ आता पर्यटनमंत्री आदित्य ठाकरें देखील कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, दरेकरांची मागणी
- ‘अब बात निकल ही गई है तो फिर दूर तलक जायेगी’, चित्रा वाघांचा ठाकरे सरकारवर निशाणा
- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण
- एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लॉकडाउनमध्येही धावणार स्मार्ट सिटी बस
- ‘नितीन राऊत साहेब…उच्च राहणीमानाचा खर्च स्वतः च्या खिशातून करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

