औरंगाबाद : तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना स्मार्ट सिटीत नोकरी देण्याचा निर्णय महापालिकेचे प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बोर्डाचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे. त्यानुसार मे महिन्याच्या अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने शहरात कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरू केली आहे. प्रकल्प अहवाल तयार करणे, कामांवर देखरेख करण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांसाठी शहर बससेवा सुरू करण्यात आली आहे. वाहतूक विभागात देखील वाहक-चालकांसह इतर कर्मचारी कार्यरत आहेत.
त्यामुळे शहरातील तृतीयपंथीयांना स्मार्ट सिटी अभियानात समावून घेण्याचा निर्णय पांडेय यांनी जाहीर केला होता. भरती प्रक्रिया केव्हा सुरू होणार अशी विचारणा पत्रकारांनी केली असता ते म्हणाले, मे अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. शहरात सुमारे ५०० पेक्षा जास्त तृतीयपंथीय आहेत. त्यांची शैक्षणिक पात्रता तपासून, पात्र ठरावीक उमेदवारांना नोकरीवर घेतले जाईल. पहिल्या टप्प्यात पाच जणांची नियुक्ती केली जाऊ शकते, असे पांडेय यांनी नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अब बात निकल ही गई है तो फिर दूर तलक जायेगी’, चित्रा वाघांचा ठाकरे सरकारवर निशाणा
- ठाकरे सरकारला अजून एक धक्का; मनसुख हिरन मृत्युप्रकरणाचा तपास NIA कडे
- बीड बायपास रस्ता रूंदीकरण मोहीम जोरात, आत्तापर्यंत १८ मालमत्तांवर कारवाई
- परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी माझ्यावर हा खोटा आरोप केला : गृहमंत्री
- ‘वाझे हा ठाकरे सरकारचा वसुली अधिकारी असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप आता सिद्ध झाला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

