मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.
मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. एका वृत्तवाहिनीने हा दावा केला आहे.
माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा दावा केला आहे. या पत्रात परमबीर सिंग म्हणतात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं. महिन्याला इतकी मोठी रक्कम बार, रेस्टॉरंट आणि अन्य संस्थांकडून वसुली करायची होती. असा धक्काद्दायक खुलासा माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेला आहे.
यावरून आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी देखील ठाकरे सरकारवर घणाघात केला आहे. ‘बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी’ ? असा टोला अमृता फडणवीस यांनी लगावला आहे.
बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी,
बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?#SachinWaze #SachinVaze #Target100Cr— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 20, 2021
दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. ‘राजकारणातील गुन्हेगारीकरण हा विषय परत ऐरणीवर आला की काय हे आताच्या गृह विभाग, पोलिस प्रशासन व सरकारच्या कारभाराकडे पाहून वाटत आहे. राज्य संकटात आहे’. असा घणाघात पंकजा मुंडे यांनी केला आहे.
राजकारणातील गुन्हेगारीकरण हा विषय परत ऐरणीवर आला की काय हे आताच्या गृह विभाग, पोलिस प्रशासन व सरकारच्या कारभाराकडे पाहून वाटत आहे. राज्य संकटात आहे.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 20, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अब बात निकल ही गई है तो फिर दूर तलक जायेगी’, चित्रा वाघांचा ठाकरे सरकारवर निशाणा
- ठाकरे सरकारला अजून एक धक्का; मनसुख हिरन मृत्युप्रकरणाचा तपास NIA कडे
- ‘पोलिस प्रशासन व सरकारच्या कारभाराकडे पाहून वाटतंय राज्य संकटात आहे’
- परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी माझ्यावर हा खोटा आरोप केला : गृहमंत्री
- ‘वाझे हा ठाकरे सरकारचा वसुली अधिकारी असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप आता सिद्ध झाला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

