Share

“कितना फोटो निकालोगे”, चाहत्यावर भडकली मलायका अरोरा; पाहा VIDEO

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत शेअर करत असते. मलायका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मालायकाचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती फोटो काढणाऱ्या चाहत्यावर भडकलेली दिसत आहे.

व्हिडिओमध्ये मलायका अरोरा योगा सेंटरमधून बाहेर येऊन कारमध्ये बसताना दिसत आहे. त्यावेळी तिचा एक चाहता तिचा फोटो काढताना दिसत आहे. आणि मलायका देखील सुरवातीला पोज देताना दिसत आहे. नंतर चाहता सारखेच फोटो काढत असल्याचे पाहून मलायका चिडते आणि अजून किती फोटो काढणार? असा प्रश्न चाहत्याला विचारते. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

मलायकाच्या पर्सनल आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, ती मागच्या काही वर्षांपासून अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. एका मुलाखतीत मालायकाने लवकरच लग्न करणार असल्याची देखील माहिती दिली आहे. मलायका आणि अर्जुन यांना त्यांच्या नात्यामुळे अनेकवेळा ट्रोलिंगला सामोरे जावे लागते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!