यवतमाळ : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात निलंबित मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी याला दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याला धारणी पोलीस ठाण्यात सर्वसामान्य कैद्यांप्रमाणे वागणूक मिळत आहे. तपास अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात न्यायालयापुढे अधिक सबळ पुरावे सादर करता यावेत, यासाठी रेड्डीची कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक डॉ. हरीबालाजी एन. यांनीही त्याची चौकशी केली.
या आत्महत्या प्रकरणात मुंबई येथील अप्पर पोलिस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनी दीपालीच्या अधिनिस्थ कार्यरत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे बयाण नोंदविले. रेड्डीला नागपुरातून गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली होती. धारणी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने गुरूवारी दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावल्याने रेड्डी धारणी पोलिसांच्या ताब्यात सर्वसामान्य कैद्यांप्रमाणे त्याला वागणूक दिली जात आहे.
दरम्यान, दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून महिला वन कर्मचाऱ्यांमध्ये रेड्डीविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येपासून रेड्डी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी समाजाच्या सर्वच स्तरातून केली जात आहे. भाजपाच्या वतीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निदर्शने व आंदोलन करण्यात आले. तसेच, वन विभागातील आणि शासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रेड्डी यांना अभय मिळते आहे असे आरोप देखील त्यांच्याकडून केले जात होते. दीपालीला न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाचा उच्चस्तरीय तपास व्हावा, अशी भाजपच्या वतीने मागणी करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
- एका लग्नाची अशीही गोष्ट! विवाहाच्या रात्रीच करवलीसह नवरी फरार
- चक्क पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरी, सव्वा लाखांचा ऐवज लंपास
- ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आपणच जबाबदार’, मंत्री हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य
- मैत्रीच्या नात्याला काळिमा! फोटो डिलिट करण्याच्या बहाण्याने बोलावून मित्राच्या पत्नीवर अत्याचार
- धक्कादायक! रुग्णालय कर्मचाऱ्यांनी कोरोना बळीच्या खिशातील पैसे काढले, पाच जणांवर गुन्हा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

