Share

Deepak Kesarkar : आम्हाला गट स्थापन करू द्यावा, अन्यथा कोर्टात जाऊ; केसरकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज (२५ जून) शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) उपस्थिती होते. या कार्यकारिणीत शिवसेनेकडून पाच महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. या कार्यकारणी बैठकीनंतर बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

केसरकर यांनी यावेळी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतील मंजूर झालेल्या ठरावांवर भाष्य केलं आहे. आम्ही अजूनही शिवसेना पक्षाचेच आहोत. उद्धव ठाकरे अजूनही आमचं ऐकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिंदे हे आमचे नेते म्हणून उद्धवसाहेबांनीच दिलेत. त्यांनी निवडलेल्या नेत्यांविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. तसेच आम्ही आमच्या गटाचं नाव हे वेगळं मागितलं नाही. मात्र आमच्याकडे दोन तृतीयांश पेक्षा जास्त संख्या असल्याने आम्हाला हे मान्य नाही. आम्हाला गट स्थापन करू द्यावा, अन्यथा कोर्टात जाऊ, असं देखील ते म्हणाले

पुढे शिवसेनेचे बाळासाहेबांचं नाव वापरायचं नाही अशी तक्रार निवडूक आयोगाकडे केल्यास आणि निवडणूक आयोगाने तसा निर्णय दिल्यावर त्याचं पालन करू. शिवसेना कुणीही हायजॅक केली नाही. उलट आमचा पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. आमच्या आमदार खासदारांना हरवण्याचा प्रयत्न केला होता. आमच्या बैठकीला नाही आला म्हणून आम्हाला निलंबित करण्याबाबत घाबरवलं जातं आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदाचा मान ठेवला जावा आम्ही कुणीही पक्ष सोडला नाही, असंही केसरकर यावेळी म्हणाले.

कार्यकारणीतील पाच महत्वपूर्ण ठराव

शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची होती, आहे आणि कायम राहिल. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर कार्यकारिणीचा विश्वास, त्यांना पक्षात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार आहेत. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे अधिकार पक्षप्रमुखांना आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव अन्य कोणालाही वापरता येणार नाही. शिवसेनेचे मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्त्वाशी बांधिलकी कायम राहिल. असे हे पाच ठराव मंजूर करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!