Share

Deepak Kesarkar | 50 खोके काय 50 रुपये जरी घेतले असतील तर मी राजीनामा देईल – दीपक केसरकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना पक्षामधील 50 आमदार गेले होते. तेव्हापासून विरोधी नेत्यांकडून 50 खोक्यांचा ’50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके!’ हा नारा दिला जात आहे. त्याचप्रमाणे शिंदे गटात गेलेल्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून पैसे घेतले असल्याचे आरोप त्यांच्यावर केले जात आहे. होणाऱ्या या आरोपांना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

तर राजीनामा देईल – दीपक केसरकर 

50 खोके काय 50 रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईल, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. सत्तेसाठी कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. विधान सभेत पायऱ्यांवर बसून आंदोलन करतात तेव्हा मी विधान परिषदेत तो मुद्दा खोदून काढला.आम्ही सरकार म्हणून जनतेतून निवडून येतो. जर त्यांचे प्रश्न पूर्ण केले जात नसतील तर उठाव होतो, असं केसकर म्हणाले आहेत.

आमदार गप्प आहेत त्यांना गप्पा राहू द्यात-

तसेच, आमदार गप्प आहेत त्यांना गप्पा राहू द्यात. खड्डे मुक्त रस्त्यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. शेतकरी देखील सुखी झालेला आहे. मागच्या वर्षी जे सरकार होतं त्यांच्या पेक्षा जास्त निधी आम्ही दिला. मग आता विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसायचा अधिकार तुम्हाला आहे का?, असा सवालही केसकरांनी विरोधकांना केला आहे.

दरम्यान, आज पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी यांच्यामध्ये धक्का-बुक्की झाली. त्यावेळी आई-बहिणींच्या शिव्या देखील देण्यात आल्या असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या  :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!