बीड: कोरोनाच्या प्राश्वभूमिवर सगळीकडेच कडक निर्बंधांसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे तसेच धार्मिक स्थळे देखील बंद ठेवण्यात आले आहेत. भाविकांची गर्दी होऊन कोरोना संसर्गाचा धोका पसरू नये या साठी हे सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने जिल्ह्यातील धारूर येथील जगदंबा देवीची यात्रा देखील रद्द करण्यात आली आहे.
धारूर तालुक्यातील सोनिमोहा येथील जगदंबा देवी येथील भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त भव्य यात्रा उत्सव भरतो. यात्रेत दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. याशिवाय विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचीही रेलचेल राहते. परंतु, कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यंदा मंगळवारी (ता.२७ एप्रिल) होऊ घातलेली यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या वर्षी या यात्रोत्सवात कोविडमुळे बाधा आली आहे.
धारूर शहराच्या उत्तरेस ८ किलोमीटर अंतरावर सोनिमोहा येथे बालाघाटचे डोंगर पायथ्यालगत जगदंबा देवी मंदिर आहे. तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे हे उपपीठ आहे. परिसरातील भाविकांचे जगदंबा देवी श्रद्धास्थान असून या पुरातन मंदिराची रचना हेमाडपंथी आहे. वर्षभरात कोजागिरी पौर्णिमा व चैत्र पौर्णिमा अशा दोन वेळा देवीची यात्रा भरते. तसेच नवरात्र उत्सवात येथे यात्रेचे स्वरूप असते तर चैत्र पौर्णिमा यात्रेस मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. यात्रेनिमित्त जगदंबा देवीच्या तांदळाची पालखीतून भव्य मिरवणूक निघते. परंतु गतवर्षीपासून सुरु झालेल्या कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी जगदंबा देवी यात्रा रद्द करण्यात आली आहे. सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थांनी तसा निर्णय घेतला आहे. सरपंच विष्णू आडागळे यांनी याबाबत पत्रक काढले आहे.
महत्वाच्या बातम्या
- शहराला मिळाला २५ हजार लसींचा साठा, पुन्हा लसीकरणाला सुरुवात
- दिलासादायक! बीड जिल्ह्यात आता तालुकास्तरावर होणार रेमेडेसिवीर इंजेक्शनची नोंदणी
- पीएचडीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून फेलोशिप मिळेना, बार्टीने अर्ज मागवले नाही
- कोरोना हरणार देश जिंकणार; सैन्याने तब्बल ४८ तासात उभारलं आयसोलेशन सेंटर
- दौलताबादजवळ दोन वाहनांचा समोरा-समोर अपघात, तिन जण ठार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

