Share

कोरोना महामारीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा : संजय राऊत

Published On: 

मुंबई : देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून त्यामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. देशात दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या भीषण समस्या निर्माण करत आहे. यामध्ये आणखी समस्या निर्माण झाल्या आहेत त्या अपुऱ्या आरोग्य सेवांमुळे २०२० प्रमाणे याही वर्षी देशातकोरोनाने हाहाकार माजवला आहे. किंबहुना मागच्या वर्षीच्या तुलनेत कोरोना हा गंभीररित्या वेगानं देशात पसरत आहे.

कोरोना महामारीमुले देशात आलेल्या या भयाण परिस्थितीला केंद्र सरकारने आता राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना नेते व राज्यसभा खासदारा संजय राऊत यांनी केली. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्याची वारंवार मागणी केली आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेही कोरोना महामारी ही राष्ट्रीय आपत्तीच आहे, असं म्हटलं आहे. आजची परिस्थिती हे राष्ट्रीय संकटच आहे.’ असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.

‘आज सर्वोच्च न्यायालयानेही कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आम्ही कोर्टाचे आभारी आहोत. कोरोनाच्या संकटामुळे सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्ट अॅक्टिव्ह झालं आहे. कोरोना कोर्टापर्यंतही पोहोचला आहे. मला वाटत त्यांच्या घरापर्यंत कोरोना गेला आहे. कोर्ट झालंय, त्यामुळे देशाला नक्कीच काही ना काही फायदा होईल,’ असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. ‘आजची परिस्थिती हे राष्ट्रीय संकटच आहे. जगही ते पाहत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हे संकट राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करावं,’ असं देखील संजय राऊत यांनी यावेळी म्हणले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!