Share

कोरोना विरोधातील लढाईत भारताला रशियाची मदत, अमेरिकेनेही रवाना केलं विमान

Published On: 

नवी दिल्ली- भारतात दिवसेंदिवस कोरोना संक्रमण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रशियाकडून वैद्यकीय उपकरणांची मदत पाठवण्यात आली आहे. रशियाने भारताला पाठवलेल्या उपकरणांमध्ये २० ऑक्सिजन कंसंट्रेटर, ७५ व्हेंटिलेटर, १५० बेडसााईड मॉनिटर आणि औषधांचा समावेश आहे.

हे साहित्य घेऊन दोन विमाने भारतात पहाटेच्या सुमारास दाखल झाली. यासंदर्भात केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने म्हटले आहे की, एअर कार्गो आणि दिल्ली कस्टम्स विभाग दोन्ही विमानातील साहित्यांचे व्यवस्थापन करत आहेत.

दुसरीकडे अमेरिकेने भारताला देऊ केलेली आप्तकालीन करोना मदतीची पहिला खेप आज पाठवण्यात येत आहे. अमेरिकेतील ट्रॅव्हिस हवाई तळावरुन करोना काळात उपयोगी पडणारी यंत्रसामुग्री आणि सामान घेऊन येणारं विमान दिल्ली विमानतळावर उतरणार आहे. अमेरिकेने ४४० ऑक्सिजन सिलेंडर्स, रेग्युलेटर्स पाठवल्याचं अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय घडामोडीसंदर्भातील विभागाने म्हटलं आहे.

दरम्यान, भारतातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्र बाल निधी विभागाद्वारे संयुक्त राष्ट्र भारताला मदत करत आहे. या संकट काळांत उपयोगांत येणाऱ्या विविध आरोग्य उपकरणांसहित 7 हजार ऑक्सिजन काँसंट्रेटर तसंच ऑक्सिजन पुरवढ्यासाठी 500 नेझल उपकरणं आणि ऑक्सिजन उत्पादक प्रकल्पांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!