दिल्ली : आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबाद संघाला ७ गडी राखुन पराभुत केले. हैदराबादने दिलेले १७२ धावांचे लक्ष्य चेन्नईने केवळ ३ गडी गमावक एकोणीसाव्या षटकात पुर्ण केले. चेन्नई सुपर किंग्सचा हा स्पर्धेतील सलग पाचवा विजय आहे. धडाकेबाज अर्धशतक करणाऱ्या ऋुतूराज गायकवाडला(७५) सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात जरी हैदराबादचा पराभव झाला असला तरी या सामन्यात संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यात अर्धशतक करताच डेव्हिड वॉर्नर हा आयपीएलच्या इतिहासात ५० अर्धशतक करणारा पहिला खेळाडू बनला आहे. ५० अर्धशतकासह ४ शतकही वॉर्नरच्या नावे आहे. त्यामुळे तो सर्वाधिकवेळा आयपीएलमध्ये ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा क्रिकेटपटू म्हणूनही त्याच्या नावावर विक्रम आहे.
Congratulations to @SunRisers captain @davidwarner31 for becoming the first batsman to register 50 half-centuries in #VIVOIPL https://t.co/dvbR7X1Kzc #VIVOIPL #CSKvSRH pic.twitter.com/YPkcphuLv5
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2021
आतापर्यंत स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाची कामगीरी ही फारच निराशाजनक राहिली आहे. आतापर्यंतच्या झालेल्या ६ सामन्यात केवळ एकच विजय मिळवण्यात हैदराबादला यश मिळाले आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात वॉर्नरने ५५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. वॉर्नरने या सामन्यात मनिष पांडेसह शतकी भागीदारी करताना संघाचा डाव सावरला होता.
आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारे क्रिकेटपटू (२८ एप्रिल २०२१ पर्यंत)
५० – डेव्हिड वॉर्नर
४३ – शिखर धवन
४० – विराट कोहली
४० – रोहित शर्मा
४० – एबी डिविलियर्स
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी सरकारची निमयावली जारी
- २४ तासानंतरही धुमसतेय वखार महामंडळाच्या गोदामाची आग;२२ कोटींचे नुकसान
- चेन्नईच्या सलग पाचव्या विजयात सुरेश रैनाने रचला अनोखा विक्रम
- राजीव सातव यांची प्रकृती खालावली,राहुल गांधींचा डॉक्टरांना फोन,मुंबईहून लीलावतीमधील टीम पुण्यात
- चेन्नई एक्सप्रेस सुसाट; हैदराबाद संघावर ७ गडी राखुन मात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

