Share

पीएम केअर्स फंडातून तब्बल एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीला मंजुरी

Published On: 

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम केअर्स निधीतून एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. कोविड व्यवस्थापनासाठी द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

याची लवकरात लवकर पूर्तता करून रुग्णसंख्या जास्त असलेल्या राज्यांना त्याचा पुरवठा करण्याच्या सूचना मोदी यांनी दिल्या आहेत. तत्पूर्वी या निधीमधून 713 पी एस ए ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आले असून 500 नवीन प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे.

डी आर डी ओ आणि सी एस आय आर नं विकसित केलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे उत्पादन देशांतर्गत उत्पादकांना हस्तांतरित करून या प्रकल्पांची स्थापना केली जाणार आहे. दरम्यान, भारतातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्र बाल निधी विभागाद्वारे संयुक्त राष्ट्र भारताला मदत करत आहे. या संकट काळांत उपयोगांत येणाऱ्या विविध आरोग्य उपकरणांसहित 7 हजार ऑक्सिजन काँसंट्रेटर तसंच ऑक्सिजन पुरवढ्यासाठी 500 नेझल उपकरणं आणि ऑक्सिजन उत्पादक प्रकल्पांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!