Share

पुनावाला यांच्या जीवाला धोका? गृह मंत्रालयाने पुरवली ‘वाय’ दर्जाची सुरक्षा

Published On: 

नवी दिल्ली- सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे ‘सीईओ’ अदर पुनावाला यांना ‘वाय’ सुरक्षा देण्यात येणार आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील.केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत आदेश दिले आहेत.

पुनावाला हे देशात कुठेही गेले तरी त्यांच्या संरक्षणार्थ ‘वाय’ दर्जाचे सुरक्षा कवच तैनात असणार आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलिस बल म्हणजेच सीआरपीएफवर सोपवण्यात आली आहे. पुनावाला यांच्यासोबत 24 तास 11 जवान तैनात राहणार आहेत. पुनावाला यांची वाढती लोकप्रियता तसेच कोरोना लढ्यात कोविशिल्ड लसीला जगभरातून मिळत असलेला वाढता प्रतिसाद याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने पुनावाला यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे.

सिरम इन्स्टिट्यूटने नुकतेच कोविशील्ड लसीचे दर जाहीर करत 50 टक्के लस खुल्या बाजारात विक्री करण्याचे जाहीर केले होते. यासाठी सिरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकार, राज्य सरकार, तसेच खासगी विक्रीसाठी कोविशील्ड लसीचे वेगवेगळे दर जाहीर केले होते. हे दर जाहीर झाल्यानंतर दरांवरून वाद सुरू झाला होता, तसेच काही संघटनांकडून याचा विरोधही केला जात होता.

मंगळवारीच भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी हडपसर येथील सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रवेशद्वारा जवळ कोविशील्ड लसीचे दर कमी करण्यासाठी निदर्शने देखील केली होती. ही सगळी पार्श्वभूमी असताना आता केद्र सरकारने आदर पुनावाला यांना सुरक्षा पुरवली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!