Share

लशीच्या वेगवेगळ्या किंमतीवरुन जावेद अख्तर भडकले,ट्वीट करत केली नाराजी व्यक्त

Published On: 

मुंबई – देशात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी देखील लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी लसींचे नवे दर जाहीर केले आहेत. आधीच आर्थिक पेचात असलेले नागरिक नव्या किंमतींमुळे अधिक पेचात पडले असून लसीकरणामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.

अनेक राज्यांनी लसींच्या वाढलेल्या किंमतीवर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर, केंद्र सरकारने या कंपन्यांना लसींच्या किंमती कमी करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, या मागणीला त्वरित प्रतिसाद देऊन सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी राज्यांसाठी कोव्हीशील्ड या लसीची किंमत ४०० रुपयांवरून ३०० रुपये प्रति डोस अशी केल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, कोरोना लशींच्या वेगवेगळ्या किमतीवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारलं आहे. यातच आता गीतकार जावेद अख्तर यांनीही लशीच्या वेगवेगळ्या किंमतीवरून केंद्र सरकारवर टीका केली. देशात एक कायदा, एक भाषा, एक निवडणूक, एक विश्वास, एक मत असावं, असा उपदेश देणाऱ्या लोकांना लशीची किंमत संपूर्ण देशात एकच असावी, असं अजिबात वाटत नाही. विचित्र गोष्ट आहे ना, असं जावेद अख्तर ट्वीट करून म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!