Share

आज भारत-इंग्लंड दरम्यान निर्णायक वनडे सामना

Published On: 

पुणे : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दुसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारतीय संघाचा ६ गडी राखुन पराभव केला. या विजयानंतर इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी करत पुनरागम केले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा व निर्णायक एकदिवसीय सामना आज (रविवारी) खेळला जाणार आहे.

इंग्लंडने या भारत दौऱ्यात एकदिवसीय मालिकेआधी कसोटी आणि टी-२० मालिका खेळली. या दोन्ही मालिका जिंकण्यात भारताला यश आले होते. त्यामुळे आता तिसरा एकदिवसीय सामना जिंकत मालिका विजयांची हॅटट्रिक साजरी करण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल. या सामन्यात भारतीय संघात काही बदल होण्याची अपेक्षा आहे.

पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये फिरकीपटूंच्या तुलनेत वेगवान गोलंदाजांना अधिक यश मिळत असल्याचे पाहायला  मिळाले आहे. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांत भारत आणि इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी मिळून २२ विकेट घेतल्या, तर फिरकीपटूंना केवळ २ विकेट घेता आल्या.

भारतीय संघ पहिल्या दोन सामन्यांत कुलदीप यादव आणि कृणाल पांड्या या फिरकी जोडगोळीसह खेळला होता. मात्र, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ केवळ एका फिरकीपटूसह (युजवेंद्र चहल) खेळू शकेल. तसे झाल्यास टी. नटराजन किंवा मोहम्मद सिराजला अतिरिक्त वेगवान गोलंदाज म्हणून संधी मिळू शकेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!