परभणी : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून दररोज शेकडोच्या संख्येने कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत आहेत. याहीपेक्षा गंभीर म्हणजे या आठवड्यात 35 कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाल्याने याबाबत चिंता व्यक्त केल्या जात आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी, कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी सायंकाळी सातपासून अत्यावश्यक सेवा वगळता, लागू केलेल्या संचारबंदी दरम्यान रस्त्यावरून नागरिकांचा मुक्तसंचार दिसत असल्याने संचारबंदीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दररोज दोनशे ते तिनशे कोरोनाबाधीत आढळू लागले आहेत.
याहीपेक्षा गंभीर म्हणजे कोरोनाबाधित व्यक्तींच्या मृत्यूची संख्याही वाढू लागल्याने चिंता वाढत आहे. शनिवारी आठ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली. रविवारी (दि.21 मार्च) दोन व्यक्तींचा, तर सोमवारी (22) तीन मृत्यू झाले. त्यानंतर मंगळवारपासून कोरोनाबाधित व्यक्तींच्या मृत्यूच्या संख्येत खुप वाढ झाल्याचे दिसून आहे. मंगळवारी (दि.23) ५, बुधवारी (दि. 24) सहा, गुरूवारी (दि. 25) पाच, शुक्रवारी (दि.26) सहा व्यक्तींचा मृत्यू झाला. रविवारपासून (दि.21) ते शनिवारपर्यंत (दि. 27 ) या सात दिवसात 35 कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वाईट सुरुवातीनंतरही भारतीय संघ कसा उभारतोय मोठी धावसंख्या
- पांड्याला गोलंदाजी न देण्याचं कारण ऐकून सेहवाग कोहलीवर भडकला
- निष्काळजीपणा भोवणार ; महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ?
- फुकटात मंत्रिपद मिळालंय, म्हणून आव्हाडांची वळवळ सुरु आहे – राणे
- शेतकऱ्यांची वीज तोडली;भाजपा आमदाराने वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांधलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
