Share

सचिन पाठोपाठ ‘या’ स्टार खेळाडूलाही कोरोनाची लागण

Published On: 

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला कोरोनाची बाधा झाल्याचे त्याने स्वतःच ट्विट करत शनिवारी सांगितले. त्याच्या पाठोपाठ आता भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणलाही कोरोनाची लागण झाली आहे. युसूफनेही स्वतः ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली. ‘माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

मला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. मला कोरोना झाल्याचे सांगण्यात आल्यावर मी स्वतःला घरीच क्वारंटाईन केले आहे. तसेच योग्य ती औषधे घेत आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी अशी मी विनंती करतो,’ असे युसूफ त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला. नुकतीच रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत सचिन आणि युसूफ भारतीय संघातून एकत्र खेळले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!