मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) कर्णधार विराट कोहलीची इच्छा पूर्ण केली आहे. वादग्रस्त सॉफ्ट सिग्नल नियम हटवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. येत्या आयपीएलच्या 14 व्या हंगामात मैदानी अंपायरला आता सॉफ्ट सिग्नल डिसीजनचा वापर करता येणार नाही.
विराट कोहलीने अलिकडेच इंग्लंडविरोधात झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यानंतर सॉफ्ट सिग्नलच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. सूर्यकुमार यादवचा झेल इंग्लंडच्या डेविड मलानने पकडला, त्यावेळी चेंडू जमिनीला स्पर्श करत असल्याचं रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होतं. पण तिसऱ्या पंचांनी ठोस पुरावा नसल्याचं सांगत सॉफ्ट सिग्नलच्या आधारे सूर्यकुमारला बाद दिलं. त्यावरुन बोलताना विराटने, “जर खेळाडूला स्वतःला माहित नाहीये की त्याने कॅच पकडला आहे की नाही, तर मैदानावरील पंच आउट असा सॉफ्ट सिग्नल कसा देऊ शकतात…सॉफ्ट सिग्नल निर्णायकच का हवा…मला कळत नाही की मैदानावरील पंच सॉफ्ट सिग्नल देताना मला माहित नाही (I Don’t Know) असं का नाही सांगू शकत”, अशी टीका विराटने केली होती.
आयसीसी अशा नियमांना बदलायला जरा उशीर करते परंतु बीसीसीआयने या प्रकरणी एक पाऊल पुढे टाकून आयपीएलच्या 14 व्या हंगामात मैदानी अंपायर सॉफ्ट सिग्नल डिसीजनचा वापर करणार नाहीत. किंबहुना सॉफ्ट सिग्नल निर्णय हटवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वाईट सुरुवातीनंतरही भारतीय संघ कसा उभारतोय मोठी धावसंख्या
- पांड्याला गोलंदाजी न देण्याचं कारण ऐकून सेहवाग कोहलीवर भडकला
- निष्काळजीपणा भोवणार ; महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ?
- फुकटात मंत्रिपद मिळालंय, म्हणून आव्हाडांची वळवळ सुरु आहे – राणे
- शेतकऱ्यांची वीज तोडली;भाजपा आमदाराने वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांधलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

