Share

राज्य सरकारच्या ढिलेपणामुळे कोरोना वाढला : हरिभाऊ बागडे

Published On: 

औरंगाबाद :  महाराष्ट्र सरकारने कोराना नियमांबाबत खुप ठिलेपणा केला. तसेच गर्दी जमु दिली, त्याता परिणाम आज कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येते. तर त्यामुळे हा लॉकडाऊन करण्याची वेळ सरकारवर आली असल्याचे मत माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या वर्षी लॉकडाऊन लावला होता. तेव्हा हेच सरकार मजुर कसे जगणार, उद्योग व्यापाराचे काय होणार. गरिब – पोच कसे भरणार असे म्हणत विरोध केला होता. परंतू आता उद्धव ठाकरे सरकारने अन लॉकची घाई करुन सर्व सरळीत झाल्याचे भासवले. आणि याचा परिणाम संपुर्ण महाराष्ट्रामध्ये कोराना रुग्णांची संख्या खुप मोठ्या गतीने वाढलेली दिसुन आली. तर आता महाराष्ट्रातील अनेक भागात  हळुहळु लॉकडाऊन घोषीत करण्यात येत आहे. आता गरिबांना काम, जेवण मिळत आहे का? आणि उद्योग व्यापार बुडत नाही का? असा सवाल या वेळी हरिभाऊ बागडे यांनी सरकारला विचारला आहे.

आता शहरासह ग्रामीण भागात देखील कोराना रुग्णांची आटोक्यात राहिलेली नाही. तसेच ती खुप झपाट्याने वाढत असल्याने तत्काळ प्रतिबंधक उपाययोजना म्हणजेच बंदचे नियम पाळले असते तर ही अवस्था आज बघायला मिळाली नसली. आणि सरकारमधील अनेक मंत्र्यांनी विविध विकास कामांचे उद्घाटन करताना खुप मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमा केली होती. तेव्हा कोरोना संपला होता का?

आणि विविध मतदारसंधामध्ये विकास कामे उद्घाटन, संमेलन, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तेव्हा खुप मोठ्या प्रमाणात विविध पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक देखील त्यांना विविध कामे करण्याच्या मागणीसाठी आले होते. तर आता गर्दी जमा केल्यानंतर कोराना वाढणार होता हे मात्र नक्कीच होते आणि तसेच झाले. याचा परिणाम आज रुग्ण वाढल्याचे दिसत असल्याचे मत देखील आमदार हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!