Share

निर्णय झाला, आदेश आलेच नाहीत औरंगाबादेत दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने सुरूच!

Published On: 

औरंगाबाद : राज्यशासनाने अत्यावश्यक किराणा सामानाचे दुकाने आता सकाळी ७ ते ११ या वेळेत खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशाबाबत अंमलबजावणी करण्यासाठी संभ्रम निर्माण झाला असून लेखी आदेश अद्यापही आलेले नसल्याने मंगळवारी ( दि.२०) दुपारी १ वाजेपर्यंत किराणा दुकाने खुली ठेवण्यात आली आहेत.

एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहे. त्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यात किराणा सामानाचे दुकाने दुपारी एक वाजेपर्यंत खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु काहीजण किराणा सामान घेण्याच्या नावाखाली देखील बाहेर फिरताना दिसून आले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. असे होऊ नये यासाठी आता राज्यातील किराणा सामानाची दुकाने सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेत सुरू ठेवण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला.

असे असले तरी शहरातील व्यापारी वर्गाला अद्यापही कुठल्याही प्रकारचे लेखी आदेश आले नसल्याने पूर्वीच्या नियमाप्रमाणेच दुपारी १ वाजेपर्यंत किराणा दुकाने खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लेखी आदेश आल्यानंतर पालन केले जाईल याशिवाय दुपारी ११ ते १ वाजेपर्यंत बाहेरून येणाऱ्या किराणा दुकानांमध्ये उतरविण्यासाठी मुभा द्यावी अशी मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात येणार आहे.

आदेश आले तर पालन करु

सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत किराणा दुकाने खुली ठेवा असे लेखी आदेश अद्यापही आले नसल्याने सर्व दुकाने दुपारी १ पर्यंत सुरू ठेवण्यात आले आहे. लेखी आदेश आले तर ११ पर्यंत किराणा दुकाने ग्राहकांसाठी खुली ठेवू मात्र त्यानंतर ११ ते १ पर्यंत बाहेरून येणारा किराणा उतरविण्यासाठी दुकाने खुली ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात येणार आहे.

जगन्नाथ काळे, अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!