उस्मानाबाद: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून, कळंब शहरासह ७० गावांत कोरोनाने आपली गंभीर अशी ‘दस्तक’ नोंदवली आहे. यात बाधितांची संख्या हजारावर पोहोचली असताना, एकट्या कळंब शहरातील रुग्णांचा आकडा चारशेपार गेला आहे. गतवर्षी मार्च महिन्यात दिल्लीत गाजत असलेला कोरोना मे महिन्यात गल्लीत दाखल झाला. या महिन्यात मुंबईच्या कुर्ला भागातून तो पाथर्डी गावात दाखल झाला.
यानंतर विविध गावांत कमी-अधिक स्वरूपात कोरोनाने आपला प्रकोप दाखवण्यास सुरुवात केली होती. पाहता-पाहता पुढील तीन महिन्यांत तालुक्यातील पन्नासपेक्षा जास्त गावांत कोरोनाचे रुग्ण आढळले होते. यातही कळंब शहरातील वाढ ही अतिशय गंभीर अशी होती. प्रशासनाने कडक लॉकडाऊन केला असताना, लोकांनी बाऱ्यापैकी याचे पालन केले असतानाही पहिल्या लाटेत तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या दोन हजाराच्या पुढे गेली होती.
यात ग्रामीण भागातील तेराशे, तर शहरातील आठशेच्या आसपास रुग्णांचा समावेश होता. याशिवाय ४५ च्या आसपास लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान, पहिल्या लाटेचा आलेख उतरता होत असताना ‘अनलॉक’ पर्व सुरू झाले. यात लोकांनी मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली तोच आता दुसऱ्या लाटेचा प्रभाव गंभीर बनला आहे. कळंब शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने जोरदार ‘कमबॅक’ केले असून, यावेळेचा वृद्धीदर सर्वांच्या काळजीत भर घालणारा आहे. अवघ्या दीड महिन्यात बाधितांची संख्या एक हजारावर गेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- योगी सरकारला ‘सर्वोच्च’ दिलासा, हायकोर्टाच्या ‘त्या’ आदेशाला स्थगिती
- कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांना क्वॉरन्टाइन करा, एमआयएमची मागणी
- ‘महाविकास आघाडी नव्हे, हे तर महाकन्फ्यूज सरकार’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
- १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस, जाणून घ्या लस घेण्याची प्रक्रिया
- ‘लस घेतलेल्या वारकऱ्यांना चैत्री वारीसाठी परवानगी द्या’, कीर्तनकार महासंघाची मागणी

