Share

जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीसह अविनाश जाधवांचे ठाण्यात ठिय्या आंदोलन

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मुद्द्यावरून दोन दिवसांपासून राजकीय वातावरण तापलंय. लसीकरण थंडावलेले असताना मात्र रेमडेसिवीरचा मुद्दा गरम झालाय. राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली होती. पण भाजपने याची पोलखोल करत राष्ट्रवादीलाच तोंडघशी पाडले. शिवाय त्यातच आज अन्न व औषध विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी भाजपने रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत आपल्याला कल्पना दिली होती अशी माहिती दिली. त्यामुळे मलिक आणखीनच गोत्यात आलेत. शिंगणे यांच्या माहितीनंतर भाजपकडून मलिक यांचा खरपूस समाचार घेण्यात येत आहे.

रोज हजारोच्या संख्येने नवे कोरोनाग्रस्त आढळत असल्यामुळे राज्यात आरोग्यव्यवस्था तोकडी पडू लागली आहे. सर्वत्र ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड आक्रमक झाल्या आहेत. आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्यामुळे त्यांनी ठाणे महापालिकेवर थेट ठिय्या आंदोलन केले आहे. विशेष म्हणजे यावेळी ऋता आव्हाड यांच्यासोबतमनसेचे नेते अविनाश जाधव हे देखील सहभागी आहेत. तसेच मनसेचे कार्यकर्तेसुद्धा सहभागी झाले होते.

ठाणे महानगर पालिका हद्दीमध्ये कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर झाली असून कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. कोरोना रूग्णांना ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि बेड उपलब्ध होत नसल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. या विरोधात महापालिका मुख्यालयाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.

दरम्यान, ठाण्यातील कोरोनास्थितीवरुन ऋता आव्हाड आक्रमक झाल्यानंतर त्यांना तसेच मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, त्यांनी जोरदार ठिय्या आंदोलन केल्यामुळे येथे काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आज पालिकेची महासभा होती. याच दिवशी राष्ट्रवादी आणि मनसेने आंदोलन केल्यामुळे या आंदोलनाची चांगलीच चर्चा रंगली.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!