Sanjay Raut | मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार गेल्या आठवड्यात कोसळले. शिवसेनेच्या ४० आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड केले याचा मोठा फटका शिवसेनेला बसला आहे. तसचे बंड केलेले आमदार संजय राऊत यांच्यामुळे शिवसेना फुटल्याचे सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. तुम्ही नेमके का गेलात ते एकदाचे ठरवा, गोंधळू नका, असा टोला संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले, “आमदारांनी मुंबईतून पलायन केलं त्यावेळी पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं की, हिंदुत्व अडचणीत आलंय त्यामुळे आम्ही गेलोय. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निधी देत नव्हते. तिसऱ्या दिवशी हे म्हणाले की, पक्षातील काही लोकं हस्तक्षेप करत होते, म्हणून आम्ही बाहेर पडलो. आता चौथ्या वेळेला ते माझं नाव घेत आहेत. त्यांनी एक ठरवावे नेमकं ते का बाहेर पडलेत. यासाठी त्यांनी कार्यशाळा घ्यायला हवी. एकदा ठरवा की तुम्ही का गेले आहात गोंधळू नका, लोकांना गोंधळात टाकू नका.”
आमदार शंभूराजे देसाईंचा गंभीर आरोप-
राज्यातील सत्तासंघर्षानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यानंतर एकनाथ शिंदे गटातील आघडीवर असलेले आमदार शंभूराजे देसाई यांनी काल साताऱ्यात पत्रकार परिषद घेत शिवसेना खासदार यांच्यावर निशाणा साधला. तसेच त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे. संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटली, त्यामुळे त्यांना मी महत्त्व देत नाही, अशी घणाघाती टीका देसाई यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :


