Share

मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या, आणि मगच नोकरभरती सुरू करा!

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजातील विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये आरक्षण मिळणार नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

केंद्र व राज्य सरकारने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये तसेच विद्यार्थ्यांना नोकरीत अडचण येवू नये यासाठी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा. यासाठी केंद्र व राज्य सरकारने नोकर भरती प्रक्रिया स्थगित ठेवावी व समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.

कोरोनामुळे उदभवलेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ आज अहमदनगर दौर्‍यावर होते. त्यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सकल मराठा समाजाच्यावतीने पालकमंत्र्यांना निवेदन दिले. केंद्र व राज्य सरकारने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये तसेच विद्यार्थ्यांना नोकरीत अडचण येऊ नये यासाठी लवकरात लवकर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांची फी शासनाने भरावी, कोपर्डी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून न्याय द्यावा, सारथी संस्थेचे कायम स्वरुपी अस्तित्व निर्माण करावे. अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमवेत आ.संग्राम जगताप, गोरख दळवी, चंद्रकांत गाडे, अ‍ॅड.शिवजीत डोके, चंद्रशेखर घुले, अभिजित खोसे, रेखा ताई जरे, बाळासाहेब पवार, दीपक लांडगे, उबेद शेख, प्रसाद डोके आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!