Share

कांदा निर्यात बंदी विरोधात नेवाशात काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्याने गेली पाच ते सहा महिने शेतमालाला कवडीमोल भाव मिळत होता. सप्टेंबरमध्ये शेतमालाला योग्य भाव मिळायला लागले असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांवरील अन्यायकारक कांदा निर्यात बंदी धोरणाचा नेवासा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून या धोरणाचा पुनर्विचार करून ते तातडीने मागे घेण्यात यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

यासंदर्भात नेवासा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कांदा निर्यात बंदीचा निर्णय त्वरित मागे घेऊन केंद्र सरकारने आपली चूक सुधारावी. कांद्याच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविषयी नाराजी तयार झाली आहे. देशातील शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून मदतीची गरज असताना केंद्र शासनाने घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय हा दुर्दैवी आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा घेतलेला निर्णय तातडीने मागे घेऊन कांदा निर्यात सुरू करावी अन्यथा नेवासा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असे निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी नेवासा तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे, सरचिटणीस प्रवीण तिरोडकर, उपाध्यक्ष सुनील भोगे, संघटक संदीप मोटे, राजेंद्र वाघमारे, कमलेश गायकवाड, नंदकुमार कांबळे, नंदकुमार कडू, तन्वीर शेख, जगन्नाथ कोरडे, रमेश जाधव, सचिन बोर्डे, आकाश धनवटे, शुभम वाघ, विशाल झगरे, सोपान मते, शुभम गायकवाड यांच्यासह तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!